पोलादपूर: रिव्हर राफ्टिंगमुळे पर्यटनाला चालना
विकास गोगावले
पोलादपूरात नरवीर एडवेंचर्स अँड स्पोर्ट्सच्या रिव्हर राफ्टिंगचे उद्घाटन
रोजगार हमी, फलोत्पादन, खारभूमी विकास मंत्री यांच्या माध्यमातून नरवीर तानाजी मालुसरे समाधी स्थळ उमरठ व कुडपण पर्यटन स्थळाच्या विकासासाठी गेल्या तीन वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात निधीची उपलब्धता करण्यात आली आहे. याच धर्तीवर नरवीर एडवेंचर अँड स्पोर्ट्स टीमच्या वतीने २७ सप्टेंबर रोजी बाजीरे धरण ते लोहारे दरम्यान रिव्हर राफ्टिंगचा शुभारंभ युवा सेना महाराष्ट्र राज्य कोकण विभाग सचिव विकास गोगावले यांच्या हस्ते करण्यात आला.