परळी: शहरातील माणिक नगर येथे भर दिवसा घरफोडी झाली, दहा लाख 44 हजाराचा ऐवज लांपास
Parli, Beed | Oct 19, 2025 शहरातील माणिक नगर येथील एकाच्या घरात लॉक बदलण्यासाठी आलेल्या चावीवाल्याने दिवसाढवळ्या कपाटातील १० लाख ४४ हजारांच्या सोन्यावर डल्ला मारला आहे. या प्रकरणातील आरोपीला परळी शहर पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना घडली आहे. परळी शहरातील माणिक नगर भागात राहणाऱ्या पांडुरंग प्रभाकर लोखंडे यांच्या घरातील लॉक बदलण्यासाठी परळीतील बबलू चावीवाला याला घेऊन आले होते. तर घरातील कपाटाचे लॉक बदलताना बबलूने मारतुल आणून देण्यासाठी सांगितल्याने घर मालक याची नजर चुकून डाव साधला.