सावनेर: जिल्हाधिकारी यांनी केली सावनेर येथील सेन्सिटिव्ह बूथ असलेल्या मतदान केंद्राची पाहणी
Savner, Nagpur | Nov 30, 2025 प्रेस नोट *अत्यंत महत्वाचे* नगरपरिषद सावनेर सार्वत्रिक निवडणूक 2025 यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर जिल्हा नागपूर यांनी मतदान यंत्रे तयार करत असताना सावनेर नगरपरिषदेस भेट दिली. त्यांनी नगरपरिषद सावनेर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन सेन्सिटिव्ह बूथ असलेले पलिया हिंदी प्राथमिक शाळा या मतदान केंद्राची पाहणी केली. त्यांच्या समवेत पोलिस अधीक्षक श्री.हर्ष पोतदार , पिठासीन अधिकारी श्री.संपत खलाटे , जिल्हा सह आयुक्त नगर विकास विभाग श्री .विनोद जाधव उपस्थित होते