पवनी: पथनाट्य-बचत गटांची 'व्होट' लाट! पवनीत स्वीप अंतर्गत मतदार जागृतीचा महाकुंभ
Pauni, Bhandara | Nov 28, 2025 आगामी नगर परिषद निवडणुकीसाठी मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी पवनी शहरात स्वीप (SVEEP) अंतर्गत संगीतमय पथनाट्य आणि महिला बचत गटांच्या सहभागाने व्यापक जनजागृती मोहीम यशस्वीरीत्या राबविण्यात आली. या दोन दिवसीय उपक्रमात शिवाजी विज्ञान महाविद्यालय आणि गांधी कनिष्ठ महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांनी आधुनिक संगीतमय कलापथक सादर करून मतदानाचे महत्त्व प्रभावीपणे पटवून दिले. जवाहर गेट येथून सुरू झालेल्या या जनजागृती मोहिमेने काली माता चौक, आझाद चौक, व चावडी मैदान अशा शहरातील प्रमुख ठिकाणी स्व-रचित ग