भद्रावती: शहरातील मुख्य रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा,अन्यथा आंदोलन.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरपरिषद कार्यालयात निवेदन.
शहरातील मुख्य रस्ता बाळासाहेब ठाकरे प्रवेशव्दार ते रेल्वेस्टेशन पर्यंत रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहतुकीस अयोग्य झाला असुन यावर अपघाताची शक्यता बळावली आहे.खराब रस्त्यामुळे नागरीक तथा शहरात दररोज येणारे पर्यटक प्रभावित झाले आहे.त्यामुळे हा रस्ता एक महिण्याच्या आत दुरुस्त करुन नागरीकांना व पर्यटकांना ऊपलब्ध करुन द्यावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे याविरोधात जनआंदोलन छेडण्यात येइल असा इशारा नगरपरिषद कार्यालयात सादर करण्यात आलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.