राजुरा नगरपरिषद निवडणुकीसाठी आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात आज दि.१७ नोव्हेंबर ला १२ वाजता उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राजुरा शहरातील भवानी मंदिरातून मुख्य मार्गाने भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष पदासह २१ उमेदवारांनी आपले अर्ज राजुरा तहसील कार्यालयात निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केले. यावेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.