हेदुटणे येथील दगडखाणी बंद करण्यासाठी आदिवासी नागरिकांनी पनवेल तहसील कार्यालय, साईनगर या ठिकाणी साखळी उपोषण सुरू केले. हेदुटणे परिसरामध्ये सुरू असलेल्या दगड खाणीच्या कामामुळे गावातील नागरिकांचे जीवन धोकादायक झाले आहे. स्फोटक ब्लास्टिंगमुळे घरांच्या भिंतींना तडे गेले असून अनेक घरे पडण्याच्या अवस्थेत आहेत. मोठ्या प्रमाणावर उडणारी धूळ आणि प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे.