बांबू क्षेत्रातील शैक्षणिक उन्नती,संशोधन, कौशल्यविकास आणि उद्योजकता वाढीसाठी चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र (बीआरटीसी) आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्यात आज दि १ डिसेंबर ला १२ वाजता ऐतिहासिक सामंजस्य करार विद्यापीठाच्या कुलगुरू माधवी खोडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.