नागपूर ग्रामीण: हुडकेश्वर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी: आयफोन लुटणाऱ्या टोळीला अटक
हुडकेश्वर परिसरात तरुणाला अडवून ५० हजारांचा आयफोन लुटणाऱ्या आरोपींना हुडकेश्वर पोलिसांनी गजाआड केले आहे.९ जून रोजी तक्रारदार घरी परतत असताना, दुचाकीवरून आलेल्या दोन आरोपींनी त्यांना अडवून धाक दाखवत आयफोन हिसकावून पळ काढला होता.तांत्रिक तपासाद्वारे पोलिसांनी शिवम प्रवीण भणारे (वय १८) या आरोपीला अटक केली.