तुमसर तालुक्यातील गारकाभोंगा येथे दि. 22 डिसेंबर रोजी सायं.6 वाजताच्या सुमारास गाईच्या कळपावर वाघाने हल्ला चढवून पशुपालक मनसुख राऊत यांच्या बैलाला ठार केले. दरम्यान, शिकार केलेल्या ठिकाणी वन विभागाने ट्रॅप कॅमेरा लावले असता शिकार खाण्यासाठी आलेला वाघ ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाला. यावेळी या परिसरात वाघाचे वास्तव्य असून नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आली आहे.