नागपूर शहर: बारसेनगर येथील कुख्यात आरोपीला नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित : बाबुराव राऊत वरिष्ठ पोलीस निरीक
पाचपावली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांनी 30 सप्टेंबरला दुपारी 4 वाजता दिलेल्या माहितीनुसार, बार्शी नगर येथे राहणारा कुख्यात आरोपी आदित्य उर्फ दिल्ली बब्बर याच्या विरोधात गंभीर प्रकारची गुन्हे दाखल असून आरोपीला पोलीस आयुक्त यांनी नाशिक मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित केले आहे कार्यवाही पूर्ण होईपर्यंत आरोपीला नागपूर मध्यवर्ती कारागृह येथे ठेवण्यात आले आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांनी दिली आहे