भंडारा: पलाडी फाट्याजवळ महामार्गावर भीषण अपघात! NH-53 वर थांबलेल्या ट्रकला दुसऱ्या ट्रकची मागून धडक; एक जण गंभीर जखमी
भंडारा तालुक्यातील नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर पलाडी फाट्याजवळ १८ नोव्हेंबर च्या मध्यरात्री १:३० च्या सुमारास एक भीषण अपघात घडला. श्रीकांतसिंह ठाकूर (वय ३५, रा. चापघाट, जि. रीवा राज्य मध्य प्रदेश ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा मित्र शिवशंकर सिंग (ट्रक क्र. MH-40/CD 1373 चा चालक) हा नागपूरहून रायपूरकडे जात असताना, लाखनीच्या दिशेने जाणारा ट्रक क्र. CG 08/AW 6613 चा चालक प्रमोद कुमार (वय २१, रा. आतरगाव, जि. राजनांदगाव) याने आपले वाहन निष्काळजीपणे आणि हयगईने...