किनवट: दिवाळीनिमित्त खा. नागेश पाटील आष्टीकर यांनी तालुक्यातील विविध गावच्या व्यापारी व नागरिकांच्या घेतल्या भेटीगाठी
Kinwat, Nanded | Oct 23, 2025 हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे आज किनवट तालुक्याच्या दौऱ्यावर होते त्यांनी तालुक्यातील इस्लापूर शिवनी कोसमेट या ठिकाणी आजरोजी दुपारी 1 ते 2 च्या सुमारास भेट देऊन दिपवाळी निमित्त व्यापाऱ्यांशी संवाद साधत व्यापाऱ्यांना शुभेच्छा दिल्या असून यावेळी व्यापाऱ्यांच्या अडीअडचणी देखील जाणून घेतले आहेत, तसेच परीसरातील नागरिकांच्या अडचणी देखील जाणून घेतल्या आहेत