पाथ्री: पाथरी पोखर्णी रोडवर कार-दुचाकी अपघातात मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कार चालकाविरोधात पाथरी पोलीसात गुन्हा दाखल
पाथरी पोखर्णी मार्गावर पोहेटाकळी शिवारामध्ये इनोव्हा कार क्रमांक एमएच-१४ जीडी-७७०४ आणि दुचाकी क्रमांक एमएच-२२ एएस-५१०७ मध्ये झालेल्या भीषण अपघातात दुचाकी वरील प्रल्हाद चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला , हनुमान वैराळ हे गंभीर जखमी झाल्याची घटना रविवार 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 35 वाजता घडली. याप्रकरणी सखाराम चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून कार चालकाविरोधात मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात रविवार 19 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजता गुन्हा दाखल.