यावल: मनवेल येथील माहेर असलेल्या विवाहितेचा सहा लाखासाठी छळ, यावल पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
Yawal, Jalgaon | Jan 8, 2026 यावल तालुक्यात मनवेल हे गाव आहे. या गावातील माहेर असलेल्या पल्लवी पाटील वय २६ या विवाहितेचा मेडिकल टाकण्यासाठी माहेरहून ६ लाख रुपये आणावे म्हणून पती विश्वेश बाळासाहेब पाटील, छायाबाई बाळासाहेब पाटील व बाळासाहेब लक्ष्मण पाटील सर्व राहणार दादावाडी जळगाव या तिघांनी तिचा छळ केला. तेव्हा या तिघां विरुद्ध विवाहितेच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.