अमळनेर तालुक्यातील झाडी गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. झाडी येथील ४२ वर्षीय तरुणाने राहत्या घराशेजारील चाऱ्याच्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी ११ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे