गेवराई तालुक्यात गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर बुधवार दि.24 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता गेवराई पोलिसांनी कारवाई केली आहे. म्हाळस पिंपळगाव परिसरात छापा टाकून पोलिसांनी आकाश भास्कर भिताडे, वय २३, रा. गंगावाडी, ता. गेवराई याला ताब्यात घेतले आहे. तर इतर तीन ट्रॅक्टर चालक फरार झाले आहेत.या कारवाईत चार ट्रॅक्टर व दोन केन्या जप्त करण्यात आल्या असून जप्त मालाची किंमत सुमारे चौदा लाख रुपये आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कांवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गद