फलटण: तरडगांव येथील राहत्या घरातून ५२ वर्षीय व्यक्ती झाली बेपत्ता
तरडगाव ता. फलटण येथील राहत्या घरातून ५२ वर्षीय व्यक्ती बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. याबाबत लोणंद पोलीसांनी सांगितले की तरडगांव ता. फलटण येथील राहत्या घरातून गुरुवार दि. ५ सप्टेंबरला सकाळी ९ वाजता नानासाहेब रघुनाथ मदने (वय ५२) ही व्यक्ती कोठे तरी निघून गेली. नातेवाईकांनी व्यक्तीचा परिसरात शोध घेतला मात्र व्यक्ती मिळून आली नाही. याबाबत लोणंद पोलीस ठाण्यात खबर दिली. याबाबत लोणंद पोलीस अधिक तपास करीत आहेत.