कल्याण शील रोडवर कटाई नाका येथे अचानक पाईपलाईन फुटल्याची घटना घडली. मेट्रोच्या कामादरम्यान पाईपलाईनला धक्का लागल्यामुळे ही पाईपलाईन फुटली असल्याची माहिती मिळत आहे. मात्र अचानक मोठी पाईपलाईन फुटल्यामुळे आकाशात उंच उंच पाण्याचे फवारे उडाले आणि अवघ्या काही वेळातच रस्ते देखील जलमय झाले. पाण्याचा वेग प्रचंड होता त्यामुळे रस्त्यांना नदीचे स्वरूप आले. घडलेल्या घटनेमुळे लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.