बारामती: बारामतीत खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोन सराईतांना पोलिसांची अटक
Baramati, Pune | Oct 15, 2025 तरुणावर कोयत्याने वार करत जीवघेणा हल्ला करणाऱ्या दोन सराइत आरोपींना बारामती तालुका पोलिसांनी अहिल्यानगर जिल्ह्यातून शिताफीने अटक केली. जयेश बाबासाहेब माने (वय 20), प्रथमेश बाळू गवळी (वय 20, दोघे रा.बऱ्हाणपूर, ता. बारामती) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.