अष्टापूर येथे बिबटयाने महिलेवर हल्ला केल्याची घटना एक महिन्यापूर्वी घडली होती तसेच बिबट्याचा वावर सातत्याने दिसून येत असल्याने ग्रामस्थांच्या मागणीनुसार वनविभागाने चार ते पाच पिंजरे लावले होते. त्यापैकी मंगळवारी (दि. ३० डिसेंबर) एक बिबटया जेरबंद करण्यात आला होता. त्यानंतर रविवारी (दि. ११ जानेवारी) आणखी एक बिबटया पिंजऱ्यात अडकला आहे.