महाड: महाडमध्ये राजकीय रण रंगात... सचिन ओझर्डे यांचे विकास गोगावले यांना खुले आव्हान – “माझ्या समोर निवडणूक लढून दाखवा”
Mahad, Raigad | Oct 15, 2025 महाडच्या राजकारणात आता थेट शब्दयुद्ध पेटलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सचिन ओझर्डे यांनी शिवसेना शिंदे गटाचे युवासेना कोअर कमिटी सदस्य विकास गोगावले यांना थेट ओपन चॅलेंज दिलं आहे. "माझ्या समोर निवडणूक लढून दाखवा," असा इशारा देत ओझर्डे यांनी गोगावले यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे.