कर्जत तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 548 अ वरील कशेळे भागातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे कशेळे बाजारपेठ परिसरात या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात धुळीचे लोट दिसून येत आहेत. दरम्यान, राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून रस्त्यांची कामे अपूर्ण ठेवण्यात आल्याने कशेळे बाजारपेठ येथील व्यापारी धुळीमुळे त्रस्त झाले आहेत.