जळगाव: शहर पोलिसांनी चौघांचा घातपाताचा डाव उधळला; 'भाईगिरी' करणाऱ्यांची गेंदालाल मिल परिसरातून काढली धिंड
जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरात दहशत माजवणाऱ्या आणि घातपाताच्या तयारीत असलेल्या एका टोळीचा डाव शहर पोलिसांनी यशस्वीरित्या हाणून पाडला आहे. पोलिसांनी सोमवारी १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता या टोळीतील चार सदस्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २ गावठी पिस्तुल आणि १० जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या गुन्हेगारांची ज्या परिसरात त्यांनी दहशत माजवली होती, त्याच परिसरात पोलिसांनी धिंड काढल्यामुळे भाईगिरी करणाऱ्यांमध्ये धडकी भरली असून, या कारवाईचे नागरिकांकडून मोठे कौतुक होत आहे.