स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी ब्रम्हपुरी येथील माय हेल्थ प्रो स्पा अॅण्ड वेलनेस सेंटर, शेषनगर येथे सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर मोठी कारवाई केली. काल दि 22 नोव्हेंबरला रात्री 8 वाजता मिळालेल्या गुप्त माहितीनुसार या ठिकाणी अनैतिक व्यापार सुरू असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार विशेष पोलिस अधिकारी, महिला पंच, समाजसेविका आणि बनावट ग्राहक यांच्या उपस्थितीत धाड टाकून कारवाई करण्यात आली. या कारवाईत मिझोरम व नागालँड राज्यातील तीन पिडीत महिलांची सुटका करण्यात आली.