परळी: परळीच्या फंक्शन हॉल जवळ ऑटो रिक्षाचा भीषण अपघात झाला असून एक तरुण गंभीर जखमी झाला
Parli, Beed | Oct 18, 2025 आज (शनिवार) संध्याकाळी सुमारास आठ वाजण्याच्या दरम्यान एक भीषण अपघात घडला. हा अपघात व्हीआयपी फंक्शन हॉलजवळ, हैदरच्या वली शमशानभूमीसमोरील पुलावर झाला असल्याची माहिती मिळाली आहे.समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराने अचानक कट मारल्याने ऑटोचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ऑटो उलटला. या ऑटोमध्ये काही महिला आणि लहान मुले प्रवास करत होती. हे सर्व जण एका रिसेप्शन कार्यक्रमासाठी व्हीआयपी फंक्शन हॉलकडे जात होते. अपघात इतका जबरदस्त होता की ऑटो रस्त्याच्या मध्यभागी उलटून पडला आहे.