प्रभात किड्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीवेचे दर्शन घडवत पूरग्रस्तांसाठी तब्बल १ लाख ५१ हजारांची मदत गोळा केली. दिनांक 15 ऑक्टोबर रोजी दुपारी 5 वाजताच्या सुमारास विद्यार्थ्यांनी प्रकल्पप्रमुख कु. अपूर्वा हिच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी धनादेश सुपुर्द केला. जिल्हाधिकारी महोदयांनी या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.अलीकडील अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना या लहानग्यांनी दाखवलेली संवेदनशीलता व कृतीशीलता