शेगाव: अशोक सम्राट नगर येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता
शहर पोलिस स्टेशनला हरवल्याची नोंद
अशोक सम्राट नगर येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना १७ ऑक्टोंबर रोजी रात्री ७ वाजेदरम्यान उघडकीस आली आहे. अशोक सम्राट नगर येथील कु अश्विनी राजेश निंबाळकर वय १८ वर्ष ही तरुणी कोणाला काही न सांगता घरून निघुन गेली. ती उशिरापर्यंत घरी परत न आल्याने तिचा नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला असता ती कुठेच मिळून आली नाही.यामुळे याबाबत राजेश रुपचंद निंबाळकर शेगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली.