जिंतूर: येलदरी धरणाचे दोन दरवाजे उघडून पूर्णा नदीपात्रात 4 हजार 220 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु
येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात खडकपूर्णा प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध झाल्याने त्या प्रकल्पाच्या 11 पैकी 7 दरवाजे उघडून पूर्णा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु केला. त्यामुळे पाणलोट क्षेत्रातील ते पाणी येलदरी धरणापर्यंत पोहोचले असून त्यामुळे पाटबंधारे खात्याने आज बुधवार 29 ऑक्टोबर रोजी येलदरी धरणाचे 1 व 10 हे दोन दरवाजे 0.5 मीटरने उचलून पूर्णा नदीपात्रात 4 हजार 220 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे.