राजुरा तालुक्यातील पाचगाव येथे अचानक लागलेल्या आगीत शेतकरी श्रीकृष्ण मेकलवार यांच्या अंगणातील कापसाच्या गंजीला आग लागून अंदाजे अडीच क्विंटल कापूस जळून खाक झाला.ही घटना आज दि.११ डिसेंबर सकाळी ६.०० सुमारास घडली असून या घटनेने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.