जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावात राहणारी विवाहिता मेडीकल कॉलेजला कामाला जात असल्याचे सांगून २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजेपासून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत बुधवारी २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.