कराड: आचारसंहिता आहे तरी कोठे ?, निवडणूक आयोग राज्य सरकारच्या हातचे बाहुले बनले; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची टीका
Karad, Satara | Dec 1, 2025 राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत सगळा गोंधळ घालून ठेवला आहे. तयारी नव्हती तर त्यांनी निवडणूक घेण्याची गडबड कशासाठी केली? आता ऐनवेळी देखील काही निवडणुका पुढे ढकलल्या गेलेल्या आहेत. हा सगळा पोरखेळ करून टाकला आहे. या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. या सगळ्या गोंधळाला राज्य सरकार जबाबदार आहे, अशी थेट टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. कराड येथील आपल्या निवासस्थानी सोमवारी दुपारी साडेबारा वाजता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.