दारू, गांजा विक्रीमुळे आग लागली? पुलगेट दुर्घटनेवर नागरिकांचा गंभीर आरोप
पुण्यातील पुलगेट परिसरात संध्याकाळी सुमारे ६ वाजण्याच्या दरम्यान भीषण आग लागल्याची घटना घडली. आग लागल्यानंतर परिसरात एकच धावपळ उडाली असून स्थानिक नागरिकांनी स्वतः पुढाकार घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, ज्या ठिकाणी आग लागली त्या भागात अनेक दिवसांपासून खुलेआम दारू, गांजा, बीडी आणि सिगारेटचे सेवन व विक्री सुरू असल्याच्या तक्रारी केल्या जात होत्या. निष्काळजीपणामुळेच ही आग लागली असावी, असा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, आग लागल्यानंतर सुरुवातीचे २० ते २५ मिनिटे अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले नसल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी आणि उपलब्ध साधनांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला.
#PuneFire #Pulgate #BreakingNews #PuneNews #FireIncident
Pune City, Pune | Jun 12, 2026