जळगाव: थकीत बिलांसाठी शासकीय कंत्राटदारांचे जळगाव जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन
महाराष्ट्रातील शासकीय कंत्राटदारांची थकीत बिले आणि इतर मागण्यांसाठी जळगाव जिल्हा जलजीवन पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेच्या वतीने मंगळवारी, १६ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. दुपारी १२ वाजता सुरू झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने कंत्राटदार सहभागी झाले होते.