शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला वणी शहरात मोठा धक्का बसला असून शहर संपर्क प्रमुख राजू किसन तुणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षप्रमुख मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे सादर केला आहे. तब्बल तीन दशकांहून अधिक काळ पक्षासाठी निष्ठेने काम करणाऱ्या राजू तुराणकर यांनी पक्षातील अंतर्गत राजकारण, कार्यकर्त्यांचे खच्चीकरनाच्या अन्यायामुळे हा कठोर निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.