गडचिरोली: राजगाटा चेक येथे रानटी हत्तींकडून दुसऱ्यांदा पिकाची नासधूस
रानटी हत्तींनी तालुक्यातील राजगाटा चेक अतर्गत बेलटेक रिठी गाव शिवारातील धान पिकाची नासधूस केली. हत्तींचा कळप रविवारी रात्री रिठी परिसरातील शेतात शिरून शेतकरी प्रमोद भोयर, अरुण पाल, राजेंद्र भोयर, बालाजी भोयर, दिवाकर भोयर यांच्या धान पिकाची नासधूस केली. रानटी हत्तींच्या कळपाने दुसऱ्यांदा शेतात येऊन धानासह तूर पिकाची नासधूस केली.