चांदूर रेल्वे: इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व दिव्यांग विभाग मंत्री अतुल सावे यांची आ.प्रताप अडसड यांनी घेतली भेट
आज १५ ऑक्टोबर बुधवार रोजी दुपारी अडीच वाजता मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व दिव्यांग विभाग मंत्री अतुल सावे यांची आज मुंबई मंत्रालय येथे आमदार प्रतापदादा अडसड यांनी भेट घेतली. यावेळी धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातील तांडा वस्ती विकास कामांकरिता तांडा वस्ती विकास कार्यक्रमांतर्गत निधींची उपलब्धता करण्यासंदर्भात आमदार प्रताप अडसड यांनी मागणी केली.