राजूरा: मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान स्पर्धेकरिता - राजुरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ६५ ग्रामपंचायतींना सुवर्णसंधी
दि. १७ सप्टेंबरला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची अधिकृतपणे घोषणा करणार आहेत.सुरक्षित गाव , सुशासनयुक्त गाव , महिला स्नेही गाव अशा थीम, प्रमुख क्षेत्रे असणार आहेत. प्रत्येक गावात नोडल अधिकारी नेमून ग्राम पंचायत व पंचायत समिती मध्ये समन्वय साधला जाणार. तालुका व जिल्हास्तरावर कार्यशाळा घेऊन सरपंच, ग्रामसेवक यांना या अभियानाच्या अनुषंगाने करावयाच्या विविध बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले असल्याची माहिती आज दि. १६ सप्टेंबरला १२ वा. डॉ. भागवत रतनबाई आनंदराव रिजीवाड यांनी दिली.