चंद्रपूर: श्री खाटूश्याम_बाबा मंदिराचे आ. किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भूमिपूजन
जय श्री श्याम_सेवा समिति, चंद्रपूर तर्फे अभूतपूर्व आणि भव्य श्री खाटूश्याम_बाबा मंदिराचे आ. किशोर जोरगेवार यांच्या हस्ते आज दि 1 नोव्हेंबर ला 5 वाजता भूमिपूजन मंगलमय वातावरणात संपन्न झाले. जिल्ह्यात प्रथमच इतके दिव्य, भव्य आणि भक्तिरसाने नटलेले खाटू श्याम बाबा मंदिर उभारले जात आहे. हा पवित्र आणि ऐतिहासिक उपक्रम जय श्री श्याम सेवा समिति, चंद्रपूर यांच्या तर्फे आयोजित करण्यात आला आहे.