वर्धा: भाडेतत्त्वावर (मक्त्याने) शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसानीची मदत मिळावी:मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Wardha, Wardha | Nov 3, 2025 जिल्ह्यात झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत जाहीर केली आहे. मात्र, ही मदत केवळ सातबाऱ्यावर नाव असलेल्या व्यक्तींनाच मिळणार असल्याने प्रत्यक्ष भाडेतत्त्वावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.