नागपूर ग्रामीण पोलिसांनी दोन वेगवेगळ्या प्रकरणांत बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलींचा शोध लावला आहे. बुटीबोरी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील १६ वर्षीय मुलगी मध्य प्रदेशातील बालाघाट (मौजा आंबा) येथे सापडली. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने ही कारवाई केली.