वणी: 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता शहर पोलिसात गुन्हा दाखल वणी शहरातील एका प्रभागातील घटना
Wani, Yavatmal | Nov 6, 2025 वणी शहरातील एका परिसरात घडलेल्या रहस्यमय घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सर्व कुटुंबीय घरात झोपून असताना 10वीत शिकणारी 15 वर्षीय मुलगी रहस्यमयरीत्या घरातून बेपत्ता झाली असून, तिच्या आईने वणी पोलिसात दिलेल्या तक्रारीत मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला आहे.