‘तुझ्या भावाला उचलले आहे, दोन हजार रुपये दे नाहीतर सोडणार नाही’ अशी धमकी देत खंडणी वसूल करण्यात आल्याची घटना चिखली परिसरात घडली आहे. याप्रकरणी एका तडीपार आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत १९ वर्षीय तरुणाने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.