सातारा: साताऱ्यात बळीराजा महोत्सव उत्साहात साजरा — ‘इडा पिडा टळो, बळीचं राज्य येवो’ घोषणांनी दुमदुमला परिसर
Satara, Satara | Oct 22, 2025 सातारा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात आज दुपारी बारा वाजता बळीराजा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. “इडा पिडा टळो, बळीचं राज्य येवो” अशा जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. या वेळी नागरिक, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि युवक उपस्थित होते. बळीराजाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रार्थना करण्यात आली. तसेच सामाजिक सलोखा, समानता आणि न्याय यांचा संदेश देत उपस्थितांनी बळीराजाच्या राज्यातील आदर्श मूल्ये जपण्याचे आवाहन केले.