शहरालगत असलेल्या नकोडा येथील मधुकर अवघान यांच्या गाईवर वाघाने हल्ला करून शिकार केल्याची घटना आज दि 26 ऑक्टोबर 8 वाजता उघडकीस आली .या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या वाघाचे हालचाली गावाजवळ सुरू असल्याने वन विभागाने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी माजी जि. प अध्यक्ष ब्रिजभूषण पाझारे सह गावकऱ्यांनी केली आहे.