रहाटे कॉलनी परिसरात नागपूरकरांनी आज द बर्निंग बीएमडब्ल्यू चा थरार अनुभवला. त्यामुळे काही वेळासाठी या रोडवरील वाहतूकही खोळंबली होती. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. या अचानक लागलेल्या आग मध्ये पूर्ण गाडी मात्र जळून खाक झाली. यामुळे परिसरात काही वेळासाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेचे थरारक व्हिडिओ देखील समोर आले आहे. घटनेची माहिती तात्काळ अग्निशमन विभागाला देण्यात आली