आज दिनांक 7 डिसेंबर सकाळी दहा वाजता छत्रपती संभाजीनगरमध्ये नायलॉन मांजामुळे आणखी एक गंभीर घटना समोर आली आहे. सेंट्रल नाका परिसरात ३ वर्षीय स्वरांश संजीव जाधव या बालकाचा गळा नायलॉन मांजाने कापल्याने गंभीर जखमी झाला. खंडोबाच्या दर्शनासाठी आई-वडिलांसोबत दुचाकीवर जात असताना मांजा अचानक गळ्यात अडकल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. तातडीने एमजीएम रुग्णालयात नेऊन शस्त्रक्रिया करण्यात आली असून २० पेक्षा जास्त टाके देण्यात आले आहेत. स्वरांशची प्रकृती आयसीयूमध्ये चिंताजनक आहे.