नवीन दुचाकी व चार चाकी गाड्या कमी किमतीत मिळवून देतो असे सांगून लाखोंची फसवणूक करणाऱ्या एम एच मोटर्सच्या मालकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे अटकेतील आरोपीचे नाव मोहम्मद सरफराज मोहम्मद शकील असे सांगण्यात आले आहे. तर या प्रकरणी फरार साथीदार एम एच मोटर्स चे मालक फिरोज हमीद खान पठाण, वहिद आलम, जय कुखे चा शोध पोलीस घेत आहे.