राज्य शासनाच्या महसूल आणि वनविभागाने आज 31 डिसेंबर 2025 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार अहिल्यानगर जिल्ह्यात माहे सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या सततचा पाऊस या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला शेत पिकांच्या नुकसानापोटी बाजींदना मदत देण्यासाठी शासनाने निधी वितरणास मंजुरी दिली आहे 1815 लाभार्थी शेतकऱ्याना सततच्या पावसामुळे 875000 एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे ही मदत डीबीटी पोर्टल द्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल