मोहाडी: मांढळ येथे रेल्वे रुळाजवळ आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह, मोहाडी पोलिसांचा तपास सुरू
मोहाडी पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या मौजा मांढळ येथे रेल्वे रुळाजवळ एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याची घटना दि. 21 सप्टेंबर रोज रविवारला दुपारी ,3.30 वा.च्या सुमारास उघडकीस आली. यावेळी मोहाडी पोलिसांनी अनोळखी इसमाच्या मृतदेहाला उत्तरीय तपासणीसाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे रवाना केले. दरम्यान, सदर अनोळखी इसम कोण? व कुठला? याचा पुढील तपास मोहाडी पोलीस करीत आहेत.